काही उमेदवार थेट तहसील कार्यालयातील स्ट्रॉगरूमकडे धावले

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) : शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्रॉगरूममध्ये सोमवारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची हार्डडिस्क बदलण्यात आली. यामुळे शहरभर गोंधळ उडाला. कॅमेरे बंद आहेत का? स्ट्राँगरूममध्ये काही घडले का? ईव्हीएम सुरक्षित आहेत का? असे प्रश्न नागरिकांमध्ये पसरले. काही उमेदवार थेट स्ट्रॉगरूमकडे धावले. या वेळी परिसरात तणाव निर्माण झाला होता.
२ डिसेंबर रोजी वैजापूर नगर परिषद निवडणूक पार पडली. ३ डिसेंबरला निकाल लागणार होता. मात्र काही प्रभागांच्या तक्रारी न्यायालयात गेल्याने प्रक्रिया थांबवण्यात आली. निवडणूक आयोगाने २१ डिसेंबर ही नवीन तारीख जाहीर केली. मतदानानंतर सर्व ईव्हीएम स्ट्रॉगरूममध्ये ठेवण्यात आल्या. तेथे सीसीटीव्ही आणि पोलिसांच्या देखरेखी खाली आधीच कल्पना दिली होती.

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अरुण जन्हऱ्हाड म्हणाले की, निकाल लांबणीवर गेल्याने फुटेज दीर्घकाळ जतन करण्यासाठी मोठ्या क्षमतेची हार्डडिस्क बसवण्यात आली. याबाबत सर्व उमेदवारांना आधीच माहिती देण्यात आली होती. 

त्यामुळे कोणतीही शंका किंवा अफवा खरी नाही. सुरक्षा ठेवण्यात आली आहे. मतमोजणीची तारीख पुढे गेल्याने ४ हजार जीबी क्षमतेची नवीन हार्डडिस्क बसवण्यात आली. यामुळेच सोमवारी अफवा पसरल्या. काहींनी कॅमेरे बंद असल्याचा संशय व्यक्त केला. काही उमेदवारांनी स्ट्रॉगरूम गाठली होती. स्ट्रॉगरूममध्ये सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यांचे चित्र थेट निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात दाखवले जाते